‘नाराज’ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत, अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. मंत्रीपद न मिळालेले माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोलंकी हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या सगळ्याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे.

आम्ही प्रकाश सोलंकी यांची समजूत काढण्याचे काम करत आहोत. मंत्रिमंडळ विस्तार होताना सगळ्यांना घेता येत नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपद दिले गेले नाही त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता ‘डॅमेज कण्ट्रोल’चा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, भोर तालुक्यातील आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नाराज कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा निषेध केला आहे. भोर-वेल्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांचे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/