खडसे अन् गायकवाडांच्या प्रवेशाचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री पवारांचा भाजपवर निशाणा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कळत नाही काय बोलावे, भाजपचे काही नेते काहीही बोलतात. कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा येणार, असे त्यांना सांगावं लागतंय. मात्र, भाजपने एकनाथ खडसे आणि जयसिंग गायकवाड यांच्यासारख्या नेत्यांचा सन्मान केला नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

विधान परिषद निवडणूक प्रचारानिमित्त ते नांदेड येथे बोलत होते. अजित पवार यांनी येथे बोलताना उपस्थित लोकांनाही आवाहन करत इशारा दिला आहे. ‘लोक कोरोना विसरले..आता नांदेडलापण खूप गर्दी झाली आहे. काळजी घ्या, अजून कोरोना गेला नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, ज्या ज्या समाजाची आरक्षणाची मागणी आहे, तेव्हा इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनतेला विनंती आहे की, आरक्षणावरून तेढ निर्माण करू नका, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

…तुमचं सरकार बोल बच्चन आहे की आमचं?

गेल्या एका वर्षात राज्याने कोरोनावर मात केली. आर्थिक परिस्थितीदेखील सुधारात आहे. कोरोनामुळे आपण सर्व पैसे आरोग्यावर खर्च केले. या व्हायरसची दुसरी लाट येऊ नये म्हणून आम्ही सगळे जिद्दीने कामाला लागलो. मात्र, फडणवीस म्हणाले, हे बोल बच्चन सरकार आहे. तुम्हीच सांगा की 15 लाख दिले का…तुमचं सरकार बोल बच्चन आहे की आमचं?’ असा सवाल करत काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपवर घणाघात केला आहे.

You might also like