‘आम्ही 4-4 वेळेला मुख्यमंत्री पद पाहिलेले लोक’, अजित पवारांची बारामतीत ‘तुफान’ फटकेबाजी

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून यावेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ‘तुमची राज्यात सत्ता होती. तसेच तुमच्या विचाराचे मंत्री होते. तुम्ही अशा पद्धतीचे राजकारण करू पाहात असाल तर आम्ही पण चार – चार वेळेला मुख्यमंत्रिपद पाहिलेले लोक आहोत. आणि आता कसे का असेना, पण चार वेळा उपमुख्यमंत्रिपद पाहिले आहे,’ अजित पवार यांच्या या वक्तव्यावर सभेत एकच हशा पिकला.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. ‘मी कसा का असेना पण चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे. पवारसाहेब चार वेळा मुख्यमंत्री होते म्हणून मीदेखील चार वेळा उपमुख्यमंत्री झालो,’ असे त्यांनी यावेळी म्हंटले. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांना बोलताना ठसकाही लागला. त्यावेळी त्यांनी पाणी मागवून घेतलं आणि म्हणाले की, आपले विरोधक म्हणतील पाणीपेईपर्यंत बोलत होता. त्यानंतर पवार यांनी आपण घरी असून घरी सभा खेळीमेळीत व्हावी म्हणून असं बोलल्याचं स्पष्टीकरण दिलं.

दरम्यान, माळेगाव कारखाना हा भाजपच्या ताब्यात असल्याची खदखद पवार कुटुंबीयांच्या मनात असून कोणत्याही परिस्थितीत हा सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात घ्यायचा असही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. ‘मागील पाच वर्षापासून आपले नेते शरद पवार हे माळेगाव कारखान्यात गेले नाहीत. त्यामुळे त्यांनी सन्मानाने कारखान्यात जावे अशा पद्धतीचे आपण काम करायचे आहे, से म्हणत पवारांनी सभासदांना मार्गदर्शन केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/