छगन भुजबळांचा ‘रूद्रावतार’, पहिल्याच बैठकीत घेतली अधिकार्‍यांची ‘शाळा’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. यांनतर भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळ यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना कामं का होत नाहीत, असे खडसावून विचारत अधिकाऱ्यांची चांगली हजेरी घेतली. दरम्यान, भुजबळांनी दहा दिवसांचा अल्टिमेटम अधिकाऱ्यांना दिला आहे.

जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक नुकतीच पार पडली. यावेळी छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना, तो खर्चच होत नसल्याचं आढळून आल्यानंतर, भुजबळ यांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच 10 दिवसांनंतर पुन्हा एकदा बैठक बोलावून कामाचा आढावा घेतला जाईल असे सांगत, त्यात जर हलगर्जीपणा आढळला तर थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला. छगन भुजबळ यांचा हा अवतार पाहून अधिकाऱ्यांची तंद्री उडाली आहे.

तसेच, मागच्या सरकारच्या काळात नेमकं काय काम झालं हे स्पष्ट दिसतच आहे, असं म्हणत सगळं आकाशच फाटलेला आहे, कुठे कुठे ठिगळ लावायचं, असा सवालही भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला. यांनतर छगन भुजबळ यांनी या वेळी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, कृषी विभाग या सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like