आगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत लढण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं विधान, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुका (Assembly elections) स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. दरम्यान यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सरकार चालवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र असून 2024 च्या लोकसभा अन् विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कायम राहील, असे सूतोवाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी वर्धापनदिनाच्या भाषणात केले होते.

नवाब मलिक (Nawab Malik) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, किमान समान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. शेतकरी हित असो किंवा कोरोनाच व्यवस्थापन सरकारच्या कामगिरीवर सामान्य माणूस समाधानी आहे. तसेच पटोलेंनी कॉंग्रेस आगामी निवडणूका स्वतंत्रपणे लढणार असल्याचे म्हटले आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. कोणालाही एखाद्या पदाची अपेक्षा करण्यापासून रोखल जाऊ शकत नाही. सर्वच पक्षांना आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी काम करावे लागते, असे मलिक यांनी म्हटले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार लढवल्या जातात. त्यामुळे काही ठिकाणी या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून किंवा काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यास सरकारमधील प्रत्येक पक्ष मोकळा असल्याचे ते म्हणाले. तसेच किमान समान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकेल, असा विश्वासही मलिक (Nawab Malik) यांनी व्यक्त केला आहे.

Wab Title :- ncp leader and minister nawab malik shivsena congress 2024 state assembly lok sabha election

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

इस्त्रायलमध्ये नवीन सत्ता ! 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा