… तर चंद्रकांत पाटील गल्लीतील तरी कार्यकर्ते आहेत का, राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांचा सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खूप छोटे नेते असे संबोधणारे चंद्रकांत पाटील गल्लीतले तरी कार्यकर्ते आहेत का, याचा त्यांनी जरुर विचार करावा, एका राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण जबाबदारीने बोलावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. परंतू कोल्हापूरातून आलेले हे पार्सल त्याला शहाणपण सूचेल, असे वाटत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे ( ncp-leader-ankush-kakade) यांनी चंद्रकांत पाटलांवर (bjp-president-chandrakant-patil) खरमरीत टीका केली आहे.

राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली होती. यावर काकडे यांनी पाटील यांना प्रत्युतर दिले आहे.

काकडे म्हणाले की, ज्यांचे दिल्लीतील नेते पवार साहेबांना गुरु मानतात. अनेक विषयावर सल्ले घेतात. अशा पवार साहेबांचा कमी अभ्यास असलेले छोटे नेते असे संबोधणारे चंद्रकांत पाटील यांनी एकदा त्यांच्या दिल्लीतील नेत्यांशी जरुर चर्चा करावी, पवार साहेबांचा राजकारण, समाजकारण, कृषी, सहकार, शिक्षण क्षेत्रातील अभ्यास किती आहे. हे पाटलांनी शिकून घ्यावे, अशी जोरदार टीका काकडे यांनी पाटलांवर केली आहे. आपण कुठून आलो अन कुठे चाललो हे ज्यांना समजत देखील नाही, त्यांनी पवार साहेबाबद्दल असे बोलणे, राजकारणातील विनोद असल्याचे ते म्हणाले.