कर्जमाफीत न बसणार्‍या शेतकर्‍यांना देखील सरकार देणार मोठा दिलासा, छगन भुजबळांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. एकूण 30 लाख 57 हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

21 हजार 200 कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी खर्च होणार आहेत त्याचप्रमाणे दोन लाखांपेक्षा कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सरकार दिलासा देण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा करताच विरोधकांकडून त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला होता. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू हा शब्द पाळला नसल्याचे म्हंटले होते.

कशी असेल राज्य सरकारची कर्जमाफी ?
मार्च 2020 पासून या योजनेला सुरुवात होणार आहे यामध्ये सरकारने दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे तसेच कर्जाबरोबर कागदपत्रांच्या ओझ्यातून देखील शेतकऱ्यांची मुक्तता केली आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं कर्ज माफ केले जाणार आहे. कर्जाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून त्यासाठी कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज नाही.

कर्जमाफीतील महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे
बँकांकडून शेतकर्‍यांच्या खात्यांची माहिती घेणार.
मंत्री, आमदार, खासदार, शासकीय कर्मचारी यांना कर्जमाफी मिळणार नाही.
मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना लाभ मिळणार.
शेतकर्‍यांना कोणतीही अट नाही.
शेतकरी कर्जमाफी करताना आधार कार्डचा आधार.
कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांना अर्ज करण्याची गरज नाही.
भाजप सरकापेक्षा मोठी कर्जमाफी असल्याचा महाविकासआघाडीचा दावा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/