मोदी सरकारनं शरद पवारांची ‘सुरक्षा’ हटवली, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सरकारवर ‘हल्लाबोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी असलेली सुरक्षा तडकाफडकी हटवण्यात आली आहे. कोणतीही पूर्वसुचना न देता हा निर्णय घेण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. सरकारनं शरद पवार यांच्या निवासस्थानाची सुरक्षा हटवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

https://twitter.com/AwhadOffice/status/1220585567974379520

शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरक्ष हटवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत म्हटले आहे की, ईडी चौकशी झाली, मेगाभरती करून आमदार फोडले, आता काय तर सुरक्षा काढली… किती निच पातळी गाठणार ? अहो, ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचं कवच आहे, त्याला भय कुणाचे… केंद्र सरकारच्या संकुचित, कोत्या मनाचा निषेध, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, मा. शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था काढून काही होणार नाही. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. लोकांचे प्रेम, आपुलकी आणि आपलेपणा हे साहेबांचं सुरक्षाकवच आहे. सुरक्षा व्यवस्था काढली बरं झालं, आज महाराष्ट्राला समजलं भाजप किती खोट्या मनोवृत्तीचे आहे ते.

जयंत पाटील म्हणाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तन भाजपच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे भाजप आता सूडबुद्धीने वागत आहे. हे लोकशाहीसाठी घात आहे. संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, शरद पवार एक मोठे नेते आहेत. याआधी सुद्धा शरद पवार यांच्यावर हल्ला झाला होता. एका माथेफिरूने तो केला होता.

त्यातच अशी सुरक्षा काढून काय साध्य करायला पाहिजे हे दिल्लीत बसलेल्या त्यांच्या गुरुवर्यांना कळायला हवं. राज्यात सरकार स्थापन करण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे यामागे काय कुटनीती आहे हे बाघावं लागेल.

फेसबुक पेज लाईक करा –