“आघाडीची सत्ता आली असती तर विखे मुख्यमंत्री झाले असते”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उमेदवार, आमदार, खासदारांच्या पक्ष प्रवेशाचे सत्र सुरु झाले आहे. त्यावर सर्वाधिक गाजलेला प्रवेश म्हणजे डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश. त्यावरून सर्वत्र चर्चा झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुजय यांच्या भाजप प्रवेशावर आपले मत व्यक्त केले आहे. एका वृत्तपत्राशी झालेल्या मुलाखतीत त्यांनी आपले विचार मांडले.

राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं तर विखे पाटील मुख्यमंत्री झाले असते. ही गोष्ट त्यांच्या चिरंजीवांच्या लक्षात आली नाही, असं धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटलं. भाजप-शिवसेनेची युती झाली नव्हती तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सभा सुरू झाल्या होत्या. राष्ट्रवादीचे जवळपास सर्व उमेदवार निश्चित झाले आहेत. आम्ही प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजप सेनेची तर अजून यादी यायची बाकी आहे, असं सांगत त्यांनी आघाडीची लोकसभेसाठी झालेली तयारी सांगितली. तर सर्वाधिक चर्चेत राहिलेला माढा लोकसभा मतदारसंघांबद्दलही त्यांनी त्यांचे मत मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माढा लोकसभा कोण लढवणार हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. माढामध्ये मोहिते पाटील स्वतः खासदार आहेत. तिथं राष्ट्रवादी मजबूत पक्ष आहे. माढ्याबाबत पक्ष योग्य निर्णय करेल आणि ती जागा राष्ट्रवादीकडेच राहील, असं सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like