सत्ता गेल्यानं ‘वाघा’सारखी ‘जनावरं’ काहीही बरळत सुटलीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही प्रकरणांतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. यामध्ये आरे वृक्षतोडप्रकरणी आंदोलन करणारे कार्यकर्ते आणि नाणार प्रकल्पांना विरोध करणाऱ्या कार्यकर्ते यांचा समावेश आहे. सराकारच्या या निर्णयावर भाजप प्रवक्ते अवधुत वाघ यांनी अत्यंत आक्रमक शब्दात टीका केली. “नशीब… कसाबला फाशी झाली. नाहीतर त्याच्यावरचे गुन्हेही या महाराष्ट्र सरकारने कदाचित मागे घेतले असते”, असे ट्विट अवधुत वाघ यांनी केले होते.

अवधुत वाघ यांच्या टीकेचा समाचार राष्ट्रवादीचे नेत धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. “सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी ‘जनावरं’ काहीही बरळत सुटली आहेत. आपल्या हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी करताना यांना लाजा वाटत नाही का ? भाजपच्या नेतृत्वाने या वाचाळवीरांच्या नीच वक्तव्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेची ताबडतोब माफी मागावी,” अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर अनेक नाट्यमय घडामोडी नंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामाचा धडाका सुरु केला आहे. त्यांनी आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले आहेत. तसेच निवडणुकीच्या तोंडावर भाजपने घेतलेले निर्णय रद्द केले आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांचा तिळपापड होत असून त्यांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like