हाफ चड्डीची फुल पँट झाली म्हणजे माणसाला अक्कल येतेच असे नाही : धनंजय मुंडे

उरण : पोलीसनामा ऑनलाइन – हाफ चड्डीची फुल पँट झाली म्हणजे माणसाला अक्कल येते असे नाही. २३ मेला चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वत:च्या चड्डीत रहायचे. नाहीतर निवडणूकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे उरण येथील प्रचार सभेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना संघाच्या चड्डीचा उल्लेख केला होता. यावर पलटवार करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की, २३ तारखेला कोणाची चड्डी निघाली हे जनता बघेल. यावर विधानाचा धनंडय मुंडे यांनी आज समाचार घेतला. धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधताना म्हणाले, तुम्ही ग्रामपंचायत-जिल्हापरिषदेचे सदस्य नाहीत, आमदार-खासदार-मंत्री काहीच नाही मग तुमच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पवार कुटुंबियांनी जबाबदारी घेतली की त्या भागाचा विकास करणं हे त्यांचे ब्रीदवाक्य असते. शरद पवारांचा नातू व अजित पवारांचे चिरंजीव असलेल्या पार्थमध्येसुद्धा लोकांसाठी झोकून देऊन काम करण्याची धमक आहे.

You might also like