‘लाल दिवा’ नव्हे तर ‘हे’ माझं स्वप्न, धनंजय मुंडेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सेना भाजपचा काडीमोड झाल्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरु झाली आणि त्यानंतर कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार याचा देखील अंदाज वर्तवायला सुरुवात झाली. परळीतील घमासान निवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाबाबत भाष्य केले आहे.

लाल दिव्यापेक्षा मतदारसंघातील प्रत्येक घरात विकासाचा दिवा लावायचे माझे स्वप्न आहे. मतदारसंघातील प्रत्येक शेतकर्‍याला पीक विमा, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या जागा कमी होण्याऐवजी वाढल्या असल्याचे मत राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी व्यक्त केले होते. इतर पक्षांच्या विधानसभेच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादी सध्या राज्याच्या राजकारणात किंगमेकर ठरलेली आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच
मुख्यमंत्री पदावरून सेना भाजपमध्ये काडीमोड झाला असल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तिकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने संसदेत पवारांच्या राष्ट्रवादीचे कौतुक केले आहे. यामुळे आता कमी जागा असूनही सत्ता स्थापनेसाठी शरद पवार हे किंगमेकर ठरताना दिसत आहेत. मात्र शरद पवार नेमकं कोणासोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com