पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्यावर धनंजय मुंडेंनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन आक्रमक भाषण करत राज्यातील पक्ष नेतृत्त्वावर जोरदार टीका केली. पंकजा यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला. परळीत माझ्याविरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला ताकद देण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मात्र, त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेणे टाळले. पंकजा मुंडे यांच्या आक्रमक भाषणावर धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रीय दिली आहे.

पेल्यातलं वादळ पेल्यातच शमेल, अशा शब्दांत पंकजांच्या नाराजीवर धनंजय मुंडे यांनी भाष्य केले. माझ्या विरोधात असलेल्या नेत्याला रसद देण्याच आल्याचं त्या म्हणतात. त्यामुळे आम्ही ताकदवान होतो, हे तरी किमान त्या मान्य करतात. सत्ता नसतानाही आम्ही सामर्थ्यशाली राहिलो, यातच सगळं आलं. मतदार त्यांच्यावर नाराज होते, हे त्यांनी मान्य करायला हवं, अशा मोजक्या शब्दात धनंजय मुंडेंनी प्रतिक्रीया दिली.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून पंकजा मुंडे यांनी आज समर्थकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पक्षासाठी घेतलेल्या कष्टाची आठवण करुन दिली. निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरला होता. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी प्रयत्न केल्याचे पंकजा यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/