राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डीपी त्रिपाठी यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी खासदार डीपी त्रिपाठी यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. डीपी त्रिपाठी यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९५२ रोजी उत्तर प्रदेशमधील सुलतानपुर येथे झाला. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत. डीपी त्रिपाठी यांनी राजकारणाची सुरुवात कॉंग्रेसपासून केली होती, पण सोनिया गांधींच्या विरोधात काँग्रेस सोडून ते राष्ट्रवादीत सामील झाले होते.

डीपी त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे की, ‘डीपी त्रिपाठी यांच्या निधनाची वार्ता ऐकून अतिशय दुःख झाले. ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस होते. ते आम्ही सर्वांचे मार्गदर्शक होते. त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन नेहमी लक्षात ठेऊ जो त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासूनच आम्हाला दिला. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो.’

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like