ED च्या नोटीशीविरोधात खडसेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ED च्या समन्सविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ईडीने अटकेची कारवाई करू नये यासाठी खडसेने ही याचिका दाखल केल्याचे समजते. त्यावर ईडीने देखील आपल प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले आहे.

एकनाथ खडसेंनी दाखल केलेल्या याचिकेत ED ने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी केली आहे. तसेच चौकशीचीही व्हिडिओग्राफी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच तपासात सहकार्य करत असल्याने कोणतीही कठोर कारवाई न करण्याची मागणीही खडसेंनी याचिकेत केली आहे. दरम्यान ईडी सारख्या केंद्रीय स्वायत्त संस्थांनी स्वतंत्रपणे तपास करावा, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. ईडी, आरबीआय, सीबीआय यांच्यावर कुठल्याही प्रकारे दबाव असता कामा नये. तसेच त्यांनी देशाच्या सैन्य जसे काम करते तसे काम करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला आहे. पुण्यातील भोसरीतील एमआयडीसीच्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये खडसे यांची चौकशी होणार आहे.