‘ईडीला सिडी लावू’ म्हणणार्‍या एकनाथ खडसे यांना मोठा ‘धक्का’ | जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील जमीन घोटाळ्या प्रकरणी ED कडून ‘अटक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online)- Girish Chaudhary Arrest | भाजपमध्ये श्वास गुदमरल्यानंतर NCP मध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ईडीला सिडी लावू म्हटले होते. त्यांना ईडी (ED)ने आज एक मोठा धक्का दिला आहे. एकनाथ खडसेखडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary Arrest)  यांना तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने मॅनी लाँडिंग प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक (Girish Chaudhary Arrest) करण्यात आली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना महसुल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आपल्या प्रतिस्पर्धकाला काटा काढल्याचे बोलले गेले. फडणवीस यांनी या व्यवहाराची चौकशी समितीमार्फत  चौकशी केली. या चौकशी समितीने खडसे यांना क्लिन चीट दिली होती. मात्र, हा अहवाल विधानसभेत शेवटपर्यंत सादर करण्यात आला नाही.

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी व त्यांच्या पत्नी मंदाकिनी चौधरी यांच्या बँक खात्यात एका दिवसात वेगवेगळ्या कंपन्यांमधून काही कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले होते. या सर्व शेल कंपन्या होत्या. यातील एका कंपनीचा पत्ता हा पुजेचे सामान विक्री करणार्‍या दुकानाचा आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याच व्यवहारात मनी लाँड्रिंग झाला असल्याच्या संशयावरुन ईडीने चौकशी सुरु केली होती.
ईडीच्या अधिकार्‍यांनी काल गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांची सलग १३ तास चौकशी केल्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. यामुळे एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

 

Web Title : NCP leader Eknath Khadse’s son-in-law was arrested in the Pune land deal case yesterday.
He was called for questioning and later placed under arrest: Enforcement Directorate

 

हे देखील वाचा

 

Modi Cabinet Expansion | PM मोदींचे सर्व कार्यक्रम रद्द,
मंत्रिपदासाठी ‘ही’ संभाव्य यादी तयार; महाराष्ट्रातून ‘या’ नेत्यांची नावं

Bibwewadi Police | चौघींसोबत झेंगाट अन् 53 जणींसोबत लग्नाची बोलणी करत 53 लाखांना गंडा, पोलिसांकडून भामट्याला अटक; जाणून घ्या प्रकरण

Nana Patole । नाना पटोलेंचे विधानसभेत गंभीर आरोप; म्हणाले – ‘माझा फोन टॅप केला आणि नाव ठेवलं अमजद खान’