राष्ट्रवादीला मोठा धक्का ! गणेश नाईकांचा ‘या’ तारखेला भाजपात प्रवेश ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक 9 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वाशीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीतीत गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या पार्शवभूमीवर मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे 50 आणि पाच अपक्ष नगरसेवक वेगळा गट स्थापन करणार आहेत. हे नगरसेवक आयुक्तांकडे जाऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडत वेगळा गट तयार करणार आहेत. यामुळे मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे.

यापूर्वी संदीप नाईक यांनी भाजपचा झेंडा हाती घेऊन भाजपचा रस्ता धरला. संदीप नाईक यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे 22 आणि अपक्ष 4 नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिल्याने संदीप नाईक यांचे पारडे जड झाले होते. संदीप नाईक यांच्यानंतर गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर पालिकेतील नगरसेवकांनी राष्ट्रवादीमधून बाहेर पडत वेगळा गट तयार करण्याच्या हालचाली सुरु केल्याने राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई सुरु आहे. संदीप नाईक यांनी 31 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ, कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.