हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना ‘शेलक्या’ शब्दांत ‘झोडलं’, म्हणाले…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता गेल्यापासून सत्ता गेल्यापासून भाजप नेते चंद्रकांत पाटील ( BJP Leader Chandrakant Patil) मतिमंद आणि मानसिकरुग्णासारखे वक्तव्य आहेत. तसेच ते वेड्यासारखे आणि डोक्यावर परिणाम झाल्यासारखे विधान करून ते आपल हसू करून घेत असल्याचा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (NCP Leader Hasan Munshrif) यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना छोटे नेते म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. या टीकेचा हसन मुश्रीफ यांनी अत्यंत शेलक्या शब्दामध्ये समाचार घेतला आहे.

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या कोल्हापूरातील आजरा येथे झालेल्या प्रचार मेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, बहुजनांचे नेतृत्त्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडवला आहे. 10 ते 12 लोकसभेच्या व 10 ते 12 विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. देशाचे कृषी, संरक्षण मंत्री या पदांसह राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. तर चंद्रकांत पाटील यांना काहीही न करता दोनदा संधी मिळाली होती. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit pawar) यांनी देखील जोरदार हल्लाबोल करत चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखे आहे. पवारसाहेबांवर बोलण्याइतकी आपली किंमत आहे का, अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांतदादा ?
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर देखील अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली. राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.