उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांच्या ऐवजी ‘या’ नेत्याचं नाव निश्चित ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याचप्रमाणे यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी देखील मंत्री पदाची शपत घेतली. त्यानंतर आरे कारशेडला स्थगिती सारखे अनेक निर्णय ठाकरे सरकारने घ्यायला सुरुवात केली.

मात्र अद्याप ठाकरे सरकारने आपल्या मंत्री मंडळाचा विस्तार केलेला नाही त्यामुळे कोणत्या पक्षाला नेमके कोणते मंत्री पद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाला विधानसभेचे अध्यक्ष पद आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु होती ज्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांचे नाव चर्चेत होते मात्र आता पक्षाने स्वतः जयंत पाटील यांच्या नावावर शिक्का मोर्तब केल्याचे समजते. अशा प्रकारचे वृत्त एका मराठी वृत्तपत्राने प्रसारित केले आहे. या पार्श्वभूमीवरच पवार यांनी शिवसेना, काँग्रेसच्या नेतृत्वासोबत चर्चा करून सत्तेत समाविष्ट असणाऱ्या तीनही पक्षांच्या वाट्याला येणारी खाती निश्चित केली आहेत.यामध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 10, राष्ट्रवादीला 7, तर काँग्रेसला 6 मंत्रालये मिळणार असल्याची माहिती आहे.

अजित पवारांच्या नावाची का होती चर्चा
अजित पवार यांचं पक्षातील स्थान मोठं आहे त्यामुळे अजित पवार यांना पक्षात मानणारा वर्ग देखील मोठा आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांच्याकडेच दिले जाईल अशी चर्चा सुरु होती मात्र आता उपमुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील यांचे नावदेखील स्पर्धेत आले आहे.

शरद पवारांनी मोडले होते अजित पवारांचे बंड
अजित पवार यांनी आमदारांच्या नावाची यादी रातोरात राज्यपालांना देत भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली होती.

मात्र त्यानंतर अवघ्या ८० तासात शरद पवारांनी अजित पवारांचे बंड मोडून काढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाजपला पाठींबा नसल्याचे सांगत अजित पवारांचे बंड मोडून काढले होते. एवढेच नाही तर त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला होता.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/