जयंत पाटलांनी घेतली भाजपची ‘फिरकी’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी केली आहे. त्याबद्दल भाजपाने आक्षेप नोंदवला होता. भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी आरोप केला होता की, ऑनलाईन कर्जमाफी नसल्याने भ्रष्टाचार अधिक होईल. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावला. ‘विरोधात बसल्यावर त्यांना असं बोलणं क्रमप्राप्त आहे. पण आम्ही हेलपाटे न घालता कर्जमाफी देऊ,’ असं म्हणत जयंत पाटलांनी भाजपावर पलटवार केला.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खुलासा
यावेळी जयंत पाटील यांनी खुलासा केला की, ‘मंत्रिमंडळ विस्तारावरून आमच्यात मतभेद नाहीत. योग्यवेळी तारीख ठरेल असं सांगितलं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री तारीख जाहीर करतीलच. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. अजून काँग्रेसची यादी आली नाही. त्यांची चर्चा ही दिल्लीत होते. ती यादी आली की मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल.’ असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

NRC आणि CAA आंदोलनाबद्दल केले भाष्य
NRC कायद्यासाठी डिटेन्शन सेंटर जर भाजपने उभे करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते रद्द करू असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले असून कोणी कोणास मारहान करू नये. तसेच त्याचं समर्थन होऊ शकत नाही, त्याचवेळी सोशल मिडीयावर ट्रोल करताना भाषा जपून वापरली पाहिजे,’ असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/