मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौर्‍याला आव्हाडांचा ‘पाठिंबा’, म्हणाले – ‘श्री राम कोणाच्या मालकीचे नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा अयोध्येला जाणार आहेत. यासाठी त्यांनी आघाडीतील अनेक बड्या नेत्यांनाही येण्याचे निमंत्रण दिल्याचे वृत्त समोर आले आहे. यावर आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, श्री राम हे कोणाच्या मालकीचे नाहीत, जय श्री राम हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय. महात्मा गांधींच्या तोंडी ही सदैव जय सियाराम हे बोल असायचे. प्रत्येक स्त्रीला वाटतं तिच्या आयुष्यात मर्यादा पुरुषोत्तम असावा, देव देव आहे मला खंडोबामध्ये ही राम दिसतो. देव प्रत्येक कणात आहेत. देव प्रातिनिधीक आहे. प्राकृतिक आहे. जर कोणी देवाला जात असेल आणि त्याची चर्चा होत असेल तर बघायलाच नको.

आव्हाड पुढे म्हणाले की, मागील पाच वर्षात झालेले घोटाळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरयू नदीत बडवून रामाला अभिप्रेत असलेले राम राज्य निर्माण करण्यासाठी जात असतील ते चांगलेच आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचेच आहे असे बोलून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपने टिका केली होती. राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार हे चांगले आहे. तसं तर ते अडीच महिन्यापूर्वीच अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते. मात्र, सत्तेसाठी शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला असल्याची टीका होऊ लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांना श्रीरामाची आठवण झाली असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –