BJP वाले हिंदुत्वाचे मालक आहेत का ?, जितेंद्र आव्हाडांचा ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेने आज आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेने भगव्या रंगातील आणि त्यावर राजमुद्रा असलेल्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेच्या बदलत्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं डोकं असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला. याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.

महाराष्ट्रात काहीही झालं तरी जातीयवादी पक्षांना सगळीकडे शरद पवारच दिसतात. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही, अशी टीका करतानाच भाजपवाले हिंदुत्वाचे मालक आहेत का ? असा परखड सवाल गृनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांच्या आरोपाला आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, महाराष्ट्रात काहीही झालं तरी त्याचे खापर शरद पवरांवर फोडलं जात असल्याचे राजकारणात येण्यापूर्वीपासूनच पहात आलो आहे. काही लोक पवार द्वेषाने पछाडलेली आहेत. म्हणूनच या जातीयवादी पक्षांना सगळीकडे पवारच दिसत आहेत. या लोकांना शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय रात्री झोप लागत नाही, असा जोरदार हल्ला त्यांनी भाजपवर चढवला.

मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी काय करायचे काय नाही हे ते ठरवतील. त्यांच्या पक्षातील नेते ठरवती, ते शरद पवार कसे काय ठरवणार ? मनसेने कोणती भूमिका घेयची हे तेच ठरवतील. हिदुत्वाबाबत सांगायचे झालं तर भाजपवाले हिंदुत्वाचे मालक आहेत का ? हिंदुत्वाचे सर्टिफिकेट आता नागपूरमधून घ्यावं लागेल का ? हिंदू मत म्हणजे नेमके काय ? आम्हाला काय चंद्रावरची मतं मिळतात का ? असे प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –