राष्ट्रवादीचे मंत्री आव्हाड यांची थेट PM मोदींवर टीका ! ‘…त्यांनी ह्या संकटालाही इव्हेंट करायचं ठरवलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान मोदींनी आज सकाळी 9 वाजता देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता घरातील सर्व लाईटचे दिवे बंद करुन मेणबत्या पेटवून कोरोना विरुद्ध सामूहिक शक्ती दाखवण्याचे आवाहन केले आहे. यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींच्या या आवाहनावर टीका केली आहे. देशाला इतकेही मुर्खात काढू नका असे म्हणत त्यांनी एक ट्विट आहे.

जितेंद्र आव्हाड हे एवढ्यावर थांबले नाही, तर त्यांनी आणखी एक ट्विट केले की हा न्यूरोचा पुर्नजन्म म्हणतं.. अंधेरी रात में दिया तेरे हाथ में…

भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी ह्या संकटाचाही इव्हेंट करायच ठरवलं. म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका असे ही ते ट्विटमध्ये म्हणाले. या ट्विटमधून त्यांनी ‘नागिन’ या जुन्या हिंदी सिनेमातील कलाकारांचा हातात टॉर्च घेतलेला फोटोही पोस्ट केला आहे.

पंतप्रधान मोदींनी जनतेला आवाहन केले आहे की 5 एप्रिलला रात्री 9 वाजता घरातील लाईटचे दिवे बंद करुन मेणबत्या पेटवून 9 मिनिटे घराबाहेर किंवा बालकणीत यायचे आहे.