…म्हणून शरद पवार ‘जाणते राजे’, उदयनराजेंच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली. त्यामुळे भाजप आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. यावर आज पत्रकार परिषद घेत उदयनराजे भोसले यांनी प्रश्न उपस्थित केला की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी करण्याची गरज नाही. अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. परंतु जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो. उदयनराजेंच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की कोण काय बोलते याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील सर्व प्रश्नांची उत्तर शरद पवार साहेबांकडे आहेत. म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात. म्हणून काही जण सांगतात की साहेबांची करंगळी धरुन आम्ही राजकारणात आलो. जसे अनेक जण त्यांची करंगळी धरुन राजकारणात आले तसेच अनेक जण त्यांच्यावर टीका करुन वृत्तपत्राच्या हेडलाईनमध्ये आले आहेत. त्यामुळे होय, ते जाणते राजेच आहेत.

https://twitter.com/AkshayShitole21/status/1216996397842436096

महिलांना 30 टक्के आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव, कोकण रेल्वे, जेएनपीटी यांसारखे अनेक प्रकल्प शरद पवार साहेबांनी आणले. महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या इतिहासात विकासात सर्वाधिक वाटा कोणाचा आहे तर तो शरद पवार यांचा आहे, असे सांगत शरद पवार का जाणते राजे आहेत हे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा –