भाजप नेत्याचा दावा, म्हणाले – ‘देशमुख, परब यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांचा नंबर लागणार असून ते लवकरच भ्रष्टाचाऱ्यांच्या यादीत दिसतील, असा दावा भाजपा BJP नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्याच्या नावाखाली ठाकरे सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. या ठाकरे सरकारच्या कोविड भ्रष्टाचाराला भाजपा विरोध करत असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. 29) सोलापूर दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी महापालिका, कोविड सेंटर्स, रुग्णालयांना भेटी देत प्रशासनाकडून आढावा घेतला. त्यानंतर सोमय्या प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी सोमय्या म्हणाले की, सचिन वाझेंसोबत 5 अधिकारी निलंबित झाले, अनिल देशमुखांना तुरुंगात जाण्याची वेळ आली, परमबीर सिंग घरी गेले, आता अनिल परब यांचा नंबर लागला आहे आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा Jitendra Awhad नंबर आहे, त्यामुळे आगे आगे देखो होता हैं क्या असे सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना नेते प्रताप सरनाईक हे फरार आहेत, संजय राऊतांना 55 लाख रुपये परत द्यावे लागलेत. मुंबईच्या महापौरांनी एसआरएचे गाळे ढापले असल्याचे हायकोर्टात सिध्द झाल्याचे सोमय्या म्हणाले. हे सरकार पाच वर्ष टिकावे मात्र जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम भाजपतर्फे मी करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान ठाकरे सरकारने सत्तेची घमेंड करू नये, जालन्यात भाजपच्या BJP युवा कार्यकर्त्यांना 5 पोलिसांकडून जी मारहाण झाली ती निंदनीय आहे. त्यातील 4 पोलीस निलंबित झाले आहेत. पण या प्रकरणातील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करावी,अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

Also Read This : 

दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR

Video : पुण्यात नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक पोलिसानं दुचाकी थांबवली ! दुचाकीस्वारानं फरफटत नेल्यानं पोलिस हवालदार जखमी; व्हिडीओ CCTV मध्ये कैद

राज्यातील ‘या’ 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त; 15 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाढणार