‘मोदी शेठ आपल्याला येडं समजणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २०१९ चे अंतरिम बजेट काल अर्थमंत्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केले. हे बजेट म्हणजे आगामी निवडणुका समोर ठेऊन मांडण्यात आले आहे. अशी चर्चा सर्वत्र होता असताना “खिशात नाही दमडी आणि गाव जेवणाची पिटतोड दवंडी. निवडणुका जिंकण्यासाठी परत हे कर्ज काढणार, उद्या सर्वसामान्य व्याजाच्या ओझ्याखाली भरडला जाणार आणि मोदी शेठ आपल्याला येडं समजणार”, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या खास शैलीत केली आहे.

खिशात नाही दमडी !
आणि गाव जेवणाची पिटतोय दवंडी!

खिशात दोन रुपये बी नाय!
काय आता वरून पैशाचा पाऊस पाडणार हाय!.

निवडणूका जिंकण्यासाठी परत हे कर्ज काढणार !
उद्या सर्वसामान्य व्यज्या ओझ्या खाली भरडला जाणार !
आणि मोदी शेट आपलयाला येड समजणार!#अर्थबजेटचा

अख्खा देश ‘इलेक्‍शन’ मोडमध्ये गेला असताना अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या पूर्व अंदाजानुसार हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी यंदाचा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर सादर करताना घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडला. दुष्काळात होरपळणाऱ्या बळिराजाला सहा हजार रुपयांचा ‘वार्षिक सन्मान निधी’ देतानाच कामगारांना ‘श्रमयोगी मानधन’ जाहीर केले.

मध्यमवर्गीयांना दिलासा

महागाईने वैतागलेल्या मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्र्यांनी दिलासा देत वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर आता प्राप्तिकर आकारला जाणार नसल्याची “गूड न्यूज’ दिली. नुकत्याच झालेल्या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये आलेले अपयश आणि विरोधकांच्या तीव्र होत चाललेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारने हात सैल सोडत ‘होऊ दे खर्च’चे धोरण अंगिकारले. यावरून आव्हाड यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.

आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे, की खिशात नाही दमडी आणि गाव जेवणाची पिटतोय दवंडी. खिशात दोन रुपये बी नाय, काय आता वरून पैशाचा पाऊस पडणार हाय. मोदी शेठ आपल्याला येडं समजणार. या ट्विटमध्ये त्यांनी अर्थबजेटचा हा हॅशटॅगही वापरला आहे.