SSR Case : सुशांतला PM मोदींपेक्षाही जास्त महत्व दिलं जातंय, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अभिनेता सुशांत सिंह रजपूत आत्महत्या प्रकरणाला मीडियाने नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही अधिक महत्त्व दिले आहे, असे ट्विटव्दारे राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी म्हंटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह रजपूत जिवंत असताना तेवढा लोकप्रिय नव्हता. मात्र, मृत्यूनंतरच त्याची लोकप्रियता अधिक वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षाही सुशांत सिंह रजपूतला अधिक महत्त्व दिले जात आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार माजिद मेमन यांनी केले आहे. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीने मात्र मेमन यांचं हे व्यक्तिगत मत आहे, असे सांगून सारवासारव केलीय.

अभिनेता सुशांत सिंह रजपूत आत्महत्या प्रकरणाला महिना उलटून गेला तरी त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? याचा खुलासा अद्याप मुंबई पोलिसांनी केलेला नाही. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या चाहत्यांनी तसेच बॉलीवूडमधील काही मंडळींनी याबाबत जाहीरपणे व्यक्तव्य केली आहेत.

त्यामुळे आता या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आव्हान मुंबई पोलिसांपुढे आहे. त्यामुळे महिना उलटला तरी अजून तपास का लागेला? अशी विचारणा सोशल मीडियातून तसेच प्रसारमाध्यतून केली जात आहे.

अभिनेता सुशांत सिंह रजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या केली आहे, असा आरोप देखील राजकारणातील काही मंडळी अर्थात भाजपचे नेते नारायण राणे यांनी देखील केला आहे. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंह रजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय रंग आला आहे.