Chhagan Bhujbal | ‘मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मराठा आरक्षण आणि अन्य प्रलंबित मागण्या बाबत पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्ली दौरा केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक भेट घेतली. यावरून राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू असे भाष्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं होतं. वाघाशी कुणाची मैत्री होत नाही, मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिल. तर आता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री (Chhagan Bhujbal) छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) विधानावर प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ म्हणाले, राज्याच्या अनेक प्रश्नांचे उत्तर केंद्राकडे आहे. त्यामुळे जमवून घ्यावे लागते. मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असते, वाघ पंजाही मारू शकतो,” असं सूचक विधान भुजबळ यांनी केलं आहे. या दरम्यान, आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. तसेच, फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. का ते माहीत नाही. पण इकडे जर वाघाशी दोस्ती असती तर 18 महिन्यांपूर्वीच सरकार आलं असतं. परंतु, पंतप्रधान मोदींनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

Also Read This : 

 

Ratan Tata | 28 वर्षाच्या तरुणाकडून चक्क रतन टाटा घेतात ‘सल्ला’

सर्व ज्येष्ठांना व्हॅक्सीन दिल्यास देश मिळवू शकतो कोरोनापासून बचाव करण्याचे सुरक्षा कवच

IAS संजीव जयस्वाल यांचा लेटर बॉम्ब, केला ‘गोल्डन गँग’ बाबत गौप्यस्फोट !

शॉम्पू केल्याच्या दुसर्‍याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 555 जण ‘कोरोना’मुक्त, 314 नवीन रुग्णांची नोंद

फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Chhagan Bhujbal | ncp leader minister chhagan bhujbal shiv sena sanjay raut chandrakant patil statement narendra modi