राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष चक्क मोटारसायकलवर

औरंगाबाद:पोलिसनामा ऑनलाईन- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. तसेच अनेक विधानसभा मतदारसंघात वातावरण तापलेले दिसून येत आहे. विविध नेत्यांनी आणि आमदारांनी पदाचा राजीनामा देत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

जाधव यांनी आपला राजीनामा आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यासाठी ते औरंगाबादला पोहोचले असून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी हरिभाऊ बागडे चक्क मोटारसायकलवर आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे सध्या या फोटोची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला असून त्यांनी तो मंजूर देखील केला आहे.

त्यामुळे आता भास्कर जाधव यांच्या रूपाने तगडा नेता बाहेर जात असल्याने कोकणात राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, भास्कर जाधव हे राजीनामा दिल्यानंतर थेट मुंबईला रवाना होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. यावेळी अनेक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –