NCP Leader Nawab Malik | नवाब मलिक यांचा मुक्काम वाढला; विशेष न्यायालयाने फेटाळला जामीन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Leader Nawab Malik | मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा जामीन विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या बेकायदेशीर कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली होती. त्यांच्या जामिनाच्या अर्जावर आज निर्णय झाला असून तो जामीन फेटाळला आहे.
न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी १४ नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज सुनावणी झाली. न्यायालय ही सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी करणार होते. पण, त्या दिवशी न्यायालयाने आदेश तयार नसल्याचे सांगत प्रकरणाची सुनावणी ३० नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या वर्षी फेब्रुवारीमध्ये नवाब मलिक यांना अटक केली होती. तेव्हापासून मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत. सप्टेंबर महिन्यात त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण तिथे पुरेशा सुविधा नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
गोवावाला कंपाउंड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असणारे मलिक यांचे जामिनासाठी प्रयत्न सुरूच आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर, नवाब मलिकांनाही जामीन मिळेल,
अशी आशा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. पण आज झालेल्या सुनावणीत त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे.
Web Title :- NCP Leader Nawab Malik | mumbai court rejects bail plea of nawab malik in money laundering case
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर