NCP Leader Nawab Malik | नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Leader Nawab Malik | कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या (Underworld Don Dawood Ibrahim) मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी (Financial Abuse Allegations Case) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आले. दरम्यान आज (शुक्रवार) मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) तात्पुरता दिलासा दिला आहे. प्रकृती ठीक नसल्याने नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास कोर्टाने परवानगी दिली असली तरी त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

 

नवाब मलिकांना (NCP Leader Nawab Malik) वैद्यकीय जामिनासाठी विशेष न्यायालयामध्ये अर्ज केला होता. किडनीच्या आजारामुळे प्रकृती ठीक नसून पायांना सूज असल्याचं त्या अर्जात म्हटलं आहे. त्याचवेळी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याचीही मागणी केली होती.

 

 

दरम्यान, मुंबईत कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात (Criticare Hospital, Mumbai) नवाब मलिक यांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने अखेर परवानगी दिली आहे.
परिवारातील एका व्यक्तीला मालिकांसोबत उपचारादरम्यान उपस्थित राहण्यासही न्यायालयाने मुभा दिली आहे.
उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

Web Title :- special pmla court allows ncp leader nawab malik to get treated at a private hospital

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा