‘त्या’ प्रकरणी NCP चे नेते प्रफुल्ल पटेल यांना ED चे ‘समन्स’, ‘या’ तारखेला चौकशी (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इक्बाल मिर्चीसोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार झाल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावले आहे. प्रफुल्ल पटेल यांना शुक्रवारी (दि.18) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीच्या समन्सनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

पटेल यांच्या कुटुंबाने प्रमोट केलेली कंपनी आणि इक्बाल मिर्ची या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इक्बाल मेमन यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. पटेल यांच्या कुटुंबाकडून प्रमोटेड कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स प्राव्हेट लिमिटेड आणि मिर्ची कुटुंबात झालेल्या व्यवहाराचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. तसेच 2007 मध्ये सीजे हाऊस या बांधकामासाठी एक करार झाला होता. त्यावर प्रफुल्ल पटेल यांची स्वाक्षरी आहे. तर सीजे हाऊसमध्ये पटेल यांचे दोन फ्लॅट आहेत.

दरम्यान, इक्बाल फरार झाला होता आणि त्याचा लंडनमध्ये 2013 साली मृत्यू झाला. पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीने मिलेनियम डेव्हलपर्सला मिर्ची कुटुंबाकडून दोन फ्लॅट देण्यात आले होते. हे फ्लॅट नेहरू प्लेनेटेरियमच्या समोर आहेत. याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने 15 मजली सीजे हाऊस नावाची इमारत उभी केली आहे.

ED चे 11 ठिकाणी छापे
ईडीने मागील दोन आठवड्यात मुंबई ते बंगळुरुपर्यंत 11 ठिकाणी छापे टाकले आहेत. या ठिकाणी मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे चौकशी सुरु आहे. ईडीला मिळालेल्या सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे संबंधीत जागा पटेल यांच्या कुटुंबाच्या मालकी असलेल्या कंपनीच्या नावावर होण्याआधी ती जागा इकबाल मेमनची पत्नी हजरा मेमन यांच्या नावावर होती. याच जागेबाबत दोघांमध्ये करार झाला होता. या कराराची कागदपत्रे ईडीला मिळाली आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाची देखील चौकशी होऊ शकते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी