नामांतराची भूमिका शिवसेनेची, महाविकास सरकारची नाही; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचं सूचक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय झाल्याशिवाय औरंगाबाद नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. औरंगाबादचे नामांतर ही शिवसेनेची भूमिका आहे सरकारची नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (praful patel) यांनी स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून राज्यातील वातावरण तापल आहे. नामांतराच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारमधून दोन भूमिका समोर आल्यामुळे वाद अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. यावर प्रफुल्ल पटेल (praful patel) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसनं ठाम विरोध केला आहे. तर, शिवसेनेनं नामांतराच्या हालचालीही सुरु केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं आघाडीत दोन गट पडले असल्याच्या चर्चा आहेत.

पटेल म्हणाले की, समन्वय समितीत नामांतराच्या विषयावर एकमत झाल्याशिवाय हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. समन्वय समितीत चर्चा होऊन या वादावर तोडगा काढण्यात येईल. शिवसेनेचे नेते औरंगाबादला संभाजीनगर म्हणत असले तरी ती भूमिका सरकारची नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही नामांतराचा प्रस्ताव आमच्या अजेंडामध्ये नाही. नावं बदलून शहरांचा विकास होतो, असे आम्ही मानत नसल्याचे म्हटले होते.