राष्ट्रवादीची गळती सुरुच, रामराजे निंबाळकर भाजपाच्या वाटेवर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपामध्ये मोठी मेगाभरती सुरु असून राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर काही नेते भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. सातारा जिल्ह्यातील उदयनराजे यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला धक्का दिला. त्यातच आता राष्ट्रवदीचे चाणाक्य म्हणून ओळख असलेले आणि राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार रामराजे निंबाळकर हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

रामराजे निंबाळकर यांच्या निकटवर्तीयांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रामराजे भाजपामध्ये जाणार असल्याचे सांगितले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यात असलेल्या वादामुळे रामराजे पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याचे सांगितले. या दोघांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोडगा न निघाल्याने रामराजे निंबाळकर हे नाराज असल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

भोसले VS निंबाळकर

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील राजघराण्याशी संबंधित असलेले रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. अनेक सार्वजनीक कार्यक्रमामध्ये दोघे एकमेकांवर उघडपणे टीका करतात. उदयनराजे भोसले यांनी निरा-देवघर पाणी प्रश्नावर शाासनाने काढलेला अध्यादेश उशिराने काढल्याचे सांगत निंबाळकर यांनी भोसले यांच्यावर निषाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिली होती. तसचे शरद पवारांनी उदयनराजेंना आवरावे अन्यथा आम्हाला पक्षातून बाहेर पडावे लागेल असे विधान केले होते.

आरोग्यविषयक वृत्त-

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like