विरोधी पक्षनेते साने यांनी दिला राजीनामा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दत्ता साने यांनी आज पदाचा राजीनामा शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने अधिका-अधिक नगरसेवकांना संधी मिळावी, यासाठी दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत ३६ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता विरोधी पक्षनेता असतो. तसेच विरोधी पक्षनेता हा स्मार्ट सिटीचा पदसिद्ध संचालक असतो. त्यामुळे हे पद मानाचे आहे.

साने यांची १७ मे २०१८ रोजी विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ १७ मे २०१९ रोजी संपुष्टात आला आहे. साने यांची वर्षभराची कामगिरी सरस राहिली. त्यांनी विविध विषयांवर आवाज उठविला. साने यांनी आज आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !