‘मोदी सरकार केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिद्रं बुजवतंय’ : रोहित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   देशासमोर कोरोनामुळं अनेक नवीन आर्थिक समस्या आल्या. तरी मोदी सरकार केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिद्रं बुजवताना दिसत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवारांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

रोहित पवार म्हणतात, “देशावर अचानक आलेल्या कोरोना संकटात मोदी सरकारनं अर्थव्यवस्थेसंदर्भात सक्रिय धोरण स्विकारण्याची गरज आहे. देशावर कोरोनाचा दीर्घकाळ परिणाम दिसेल” अशी शक्यताही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

रोहित पवार पुढे म्हणतात, “अर्थव्यवस्थेला पुन्हा जिवंत करण्यासाठी शाश्वत सक्रिय धोरण आखण्याची गरज आहे. दुर्दैवानं केंद्र सरकार केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिद्र बुजवताना दिसत आहे. यात अनुभवाचा अभाव स्पष्ट दिसत आहे” अशी टीकाही रोहित पवार यांनी केली आहे.

‘केंद्रानं परिणामकारक धोरण आखावं’

कोरोनाचा देशावर दीर्घकाळ परिणाम राहणार आहे. आताच देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारनं पावलं उलचण्याची मागणी राजकीय पक्षांसह विविध घटकांकडू केली जात आहे. रोहित पवारांनी कोरोनाचे दीर्घ आर्थिक परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त करतानाच केंद्रानं परिणात्मक धोरण आखण्याची गरज आहे असं म्हटलं आहे.