उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, मग पंतप्रधान मोदी कुठे आहेत ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन  – महाराष्ट्र राज्यात कोरोना संकट असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे निवास्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केलीय. तसेच राज्यभरात आज जो विस्कळीतपणा सुरुय, तो याअगोदर कधी नव्हता, असेही दरेकर यांनी सांगितलंय. प्रवीण दरेकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही म्हणत आहात. मग, पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत?. ते देखील ऑफिसमध्ये बसून काम करताय ना? तसेच जीएसटीचा फंड मिळत नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंची पाठराखण केलीय.

काही अपवाद वगळता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यभर फिरताहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केलीय.

कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले होते. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले होते. पण, मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल-परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेलं, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हंटलं होतं. कोरोनाबाबात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो होतो. तर मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोलाही दरेकर यांनी लगावलाय.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे 15 तास काम करतात – बाळासाहेब थोरात
राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. प्रशासन संपूर्ण काळजी घेत आहे. तसेच मदतकार्य विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हेही स्वत: भागात फिरताहेत, असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हंटलंय. आम्ही तिथं पूरस्थितीच्या ठिकाणी जाणं योग्य नसतं. प्रशासन काम करत आहे, मुख्यमंत्रीही दररोज 15 तास काम करतात. सर्वच स्थितीवर ते काम करत असून परिस्थितीवर ते बारीक लक्ष ठेऊन आढावा घेत आहेत, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.