दादा… परत फिरा गोविंदबागेकडे, ‘या’ बहिणीची Facebook वरून अजित पवारांना ‘हाक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड करून भाजपसोबत गेले. त्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दादा तुम्ही परत या अशी सोशल मीडियावर पोस्ट टाकून अजित पवारांना येण्याचे आवाहन केले.

तर रोहित पवार यांनी देखील कुटुंबाचा फोटो व्हायरल करून अजित पवारांना पुन्हा कुटुंबात येण्याची आवाहन केले. यातच आता राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ‘दादा… परत फिरा… गोविंदबागेकडे’ या शीर्षकाखाली फेसबुक पोस्ट करून भावनिक आवाहन केले आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2648241775266129&id=100002409984911

काय म्हटले आहे रुपाली चाकणकर यांनी ?
दादा…..परत फिरा गोविंदबागेकडे, दादा ,कालच्या घडामोडी घडत असताना माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम तरळले ते आनंदाने भारलेले “गोविंदबाग “आणि हे पवार कुटुंबिय , जे आम्हाला कायमच जगण्याची ताकद देत आले…..अगदी माहेरासारखे.

वर्षभरातील कोणताच सण इतका उत्साहाने आम्ही साजरा करीत नाही, अगदी दिवाळीसुद्धा नाही, जितका दिवाळीचा पाडवा करतो, आतुरतेने वाट पाहत असतो या सणाची कारण तुम्ही सगळे एकत्र, एकाच व्यासपीठावर भेटणार असता…..लिहीताना सुद्धा डोळे पाणवतात दादा. आमचा काय गुन्हा???काय चुक आमची.??

आमच्या सगळ्या बहिणीचे आणि विशेष म्हणजे सुप्रियाताईचा दादा म्हणजे महाराष्ट्रातील हा दरारा असलेला आमचा “अजितदादा “.ताठ मानेने आम्ही महाराष्ट्रात फिरत असताना, कधी कशाचीच भिती वाटली नाही, कोणी ञास देईल याची शंका मनात आली नाही…कारण आमचा”दादा “आमच्या सोबत आहे. दादा…प्रत्येक कार्यकर्ता आतुरतेने वाट पाहतोय तुमची पाणावलेल्या डोळ्यांनी.

आयुष्याच्या या संध्याकाळी साहेबांना गरज आहे तुमची आणि तुमच्या लाडक्या सुप्रियाताईला तिच्या भाऊरायाची. आम्हां कार्यकर्तांना असंच एकञ पाहायचे आहे तुम्हाला.
दादा….परत फिरा…….गोविंदबागेकडे.

Visit : Policenama.com