राफेल ‘गेमचेंजर’ ठरणार नाही : शरद पवार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – हवाई दलात राफेल विमाने सामिल केली ही नक्कीच चांगली बाब आहे. राफेलच्या ताफ्यात सामिल झाल्यामुळे हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. भारताने 36 राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 5 राफेल विमाने भारताला मिळाली आहेत. राफेलच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्यानं चीनची चिंता वाढेल, असे वाटत नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

चीनसोबत असलेल्या तणावावर आपण गंभींरपणे विचार करत आहोत. राफेलच्या येण्याने चीनला कदाचित कोणतीही काळजी वाटणार नाही. ते आपल्यापासून खुप पुढच्या टप्प्यावर आहेत. आपल्यात आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नाही. जर भारताने सुरक्षेच्या दृष्टीने 10 गोष्टी केल्या तर चीन 1 हजार गोष्टी करेल. चीन आणि भारतात एवढी तफावात आहे. राफेलच्या येण्याने त्याची काळजी वाटेल असे मला वाटत नाही.

भारताने राफेल हवाई दलात सामावून घेतले आहे हे चांगले आहे. त्यामुळे हवाई दलाची ताकद नक्कीच वाढणार आहे. पण ते गेमचेंजर ठरेल असे वाटत नाही, असे पवार म्हणाले. राफेलसाठी काँग्रेसने 100 टक्के पुढाकार घेतला होता आणि 100 टक्के भाजपाने त्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे त्यात श्रेयवादाचा कोणता प्रश्नच उद्धभवत नाही.