… त्यामुळेच पवारांची निवडणुकीतून माघार : चंद्राकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली त्यानंतर राजकीय क्षेत्रात उलट -सुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यातच २०१९ ला वेळ आणि पैसा लावण्यापेक्षा तो २०२४ साठी वाचवून ठेवावा अशाच विचारातून शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा निर्णय घेतला असावा असे विधान केले आहे. ते मुंबई येथे सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले , ’नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-कश्मीरमधील नेत्यांना २०१९ विसरा आणि २०२४ च्या तयारीला लागा, असं विधान केलं होतं. त्याचाच पुनर्रुच्चार त्यांनी यावेळी केला. शरद पवारांनी घेतलेली माघार यातूनच आहे का असं पत्रकाराने विचारल्यावर त्यांनी यामुळे शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असावा, असं विधान केलं.

सुजय विखे-पाटील यांचा भाजपात प्रवेश

सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सुजय विखेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईतील वानखडे स्टेडियम मधील एमसीए पॅव्हेलियन येथे सुजय विखेंच्या भाजपप्रवेशासाठी भाजपसह विखेंच्या कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली गेली होती. यावेळी सुजय विखे पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित नव्हते. पण ‘ मुख्यमंत्र्यानी माझ्या वडिलांची जागा भरून काढली’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले ,” प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. गेल्या १ महिन्यापासून अनेक तर्क वितर्क या प्रवेशाबाबत चालू होते. पण भाजपातल्या नेत्यांनी मला भाजपात प्रवेश दिला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला एवढ्या मोठ्या पदावरच्या माणसाने आदर दिला, वडिलांसारखा आधार दिला त्याबाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. आज मी वडिलांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला आहे. आज माझी आई माझ्या निर्णयासोबत आहे की नाही हे मला माहित नाही पण मी डॉ . सुजय विखे-पाटील भाजपात जाण्याचा माझा वैयक्तिक भूमिका आहे. आणि मी इथून पुढे भाजपशी कर्तव्य निष्ठ राहीन” असे विखे पाटील म्हणाले.

दोन्ही खासदार भाजपचेच

यावेळी बोलताना दोन्ही खासदार भाजपचे असा विश्वास सुजय यांनी व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यात पक्षाच्या वाढीसाठी काम करणार. तसेच भाजपच्या नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबाबत मी त्यांचा आभारी आहे. असे सुजय विखे -पाटील यांनी सांगितले.

या प्रवेश सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: उपस्थित होते. अहमदनगराच्या काही निवडक कार्यकर्त्यांना आज रात्री मुंबईत येण्याचे आदेश आधीच देण्यात आले होते. त्यामुळे विखेंकडून मुंबईत मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनुश्री यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी जलसम्पदा मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रवक्ते रावसाहेब दानवे,महसूलमंत्री चंद्रकांदादा पाटील यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.

ह्याहि बातम्या वाचा –

आता नगर भाजपचा बालेकिल्ला झाला ; मुख्यमंत्र्यांचा दावा

दोन सख्ख्या भावांमध्ये मुलीवरून मारहाण

‘एकच वादा… सुजय दादा’; गरवारे क्लबमध्ये सुजय विखेंच्या नावाचाच गजर

काँग्रेस विसर्जित व्हावी ही तर महात्मा गांधींचीच इच्छा : नरेंद्र मोदी 

#GST : १ एप्रिल पासून घरे स्वस्त होणार, ‘इतक्या’ लाखांचा होणार फायदा