मध्य प्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात येईल का ? शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड केल्याने मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपचं ऑपरेशन लोटस सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मध्यप्रदेशात पडसाद उमटले असले तरी महाराष्ट्रातील स्थिती उत्तम आहे. महाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी स्थिती ओढवणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी खासदारकीचा अर्ज भरला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यावर आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले, मध्य प्रदेशात सरकार हे गेले नाही. कमलनाथ यांच्या कर्तृत्वार लोकांचा विश्वास आहे. ते काही करू शकतात का बघावे लागेल. परंतु, सिंधिया राजे यांच्या समवेत चर्चा संवाद व्हायला हवा होता. कदाचित तिथ कमी काही झाले असावे असे मत शरद पवार यांनी केले. तसेच काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्व आहे, कर्तृत्त्व ही आहे आणि भविष्यही असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

राज्यातील महाविकास आघाडीला शंभर दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे या सरकारला तुम्ही किती मार्क द्याल या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, राज्य सरकारला शंभर टक्के गुण देईन. हे तीन पक्षाचं सरकार आहे आणि शंभर दिवस चाललं. त्यामुळेच या सरकारला शंभर टक्के गुण देईन असे त्यांनी सांगितले.

यावेळी मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केली असेल तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांनी चांगलं काही तरी केलं पाहिजे. लोकांसमोर चांगलं गेलं पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले. कोरोना व्हायरसबाबत आवाहन करताना शरद पवार म्हणाले, आयपीएलसाठी होणारी गर्दी टाळली पाहिजे अस सांगतानाच शक्यतो सभा, मेळावे टाळा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केली.