राजकीय पटावर शरद पवार यांची मोठी चाल ! काँग्रेसला वगळून इतर विरोधी पक्षांसोबत उद्या दिल्लीत घेणार बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकारणाच्या पटावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे NCP नेते शरद पवार यांनी मोठी चाल खेळली आहे. पवार मंगळवारी दिल्लीत काँग्रेसला वगळून अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक (Sharad Pawar meeting in Delhi) घेतील. मोदी सरकारच्या धोरणांविरूद्ध 2018 मध्ये यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंचाची स्थापना केली होती. सिन्हा आता टीएमसीचे उपाध्यक्ष आहेत. दिल्लीत सायंकाळी 4 वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार्‍या बैठकीत शरद पवार आणि यशवंत सिन्हा (Sharad Pawar-Yashwant Sinha meeting) यांच्यासह काही अन्य नेते सुद्धा सहभागी होणार आहेत. बैठकीशी संबंधीत एका नेत्याने म्हटले की, शरद पवार राष्ट्रमंचाला (Rashtra Munch) काही सल्ले देतील.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पवारांच्या घरी राष्ट्रमंचाच्या बैठकीचा अर्थ !
मात्र, राष्ट्रमंच कोणताही राजकीय मंच नाही, परंतु भविष्यात याच्या माध्यमातून देशात एखाद्या तिसर्‍या पर्यायाची शक्यता नाकारता येत नाही,
कारण राष्ट्रमंचमध्ये सरकारच्या विरूद्ध राजकारणासह इतर मुद्द्यांवर चर्चा होते.
शरद पवार पहिल्यांदा राष्ट्रमंचाच्या बैठकीत सहभागी होतील, अशावेळी राष्ट्रमंचाचे निर्णय आणि हालचाली महत्वाची ठरतील.

Yuva Udyami Yojana | 10+2 पास तरुण मिळवू शकतात 10 लाखापर्यंतची आर्थिक मदत, जाणून घ्या डिटेल्स

पवार (Sharad Pawar) – प्रशांत किशारे भेटीनंतर ही बैठक
राजकारणाच्या दृष्टीने काही आणखी बाजूंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
म्हणजेच, अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP प्रमुख शरद पवार यांची भेट निवडणूक रणनिती तज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्याशी झाली होती आणि त्यानंतर राष्ट्रमंचाची बैठक होत आहे.
आजही प्रशांत किशोर यांच्याशी त्यांची भेट झाली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखील या सर्व राजकीय हालचालींमध्ये मोठी भूमिका असू शकते.

राष्ट्रमंचाची स्थापना करणारे यशवंत सिन्हा आता टीएमसीचे उपाध्यक्ष आहेत आणि बंगालमध्ये टीएमसीच्या झालेल्या विजयात प्रशांत किशोर यांची महत्वाची भूमिका होती.
या सर्व बाजूंचा विचार करता पडद्याच्या पाठीमागे काही होणार नाही असेही म्हणता येणार नाही.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : ncp leader sharad pawar to host meeting of non congress parties on tuesday

हे देखील वाचा

Suicide News | धक्कादायक ! पोटच्या दोन मुलींसह वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

Lava True Wireless Earbuds । 1 रुपयांत मिळणार वायरलेस Earbuds; ‘या’ तारखेपासून घेता येणार ‘Lava’ च्या इंट्रोडक्टरी ऑफरचा लाभ