विधानसभेसाठी खा. सुप्रिया सुळे राज्यात ‘अ‍ॅक्टीव्ह’, सेना-भाजपला ‘टक्‍कर’ देण्यासाठी घेतली राहूल गांधींची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे तर अजित पवार हे विविध जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीची रणनिती आखत आहेत. त्याचबरोबर यामध्ये पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील कुठे कमी पडताना दिसत नाहीत. त्यांनी देखील या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

विधानसभेत देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे केंद्रातील नेते देखील संसदेत महाराष्ट्र्रातील प्रश्नांना वाचा फोडून आपापल्या परीने या सरकारला खाली खेचण्याचे प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुप्रिया सुळे यांनी काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले कि, महाराष्ट्रातील विषयांवर या भेटीत चर्चा झाली. महाराष्ट्रातील दुष्काळ, सरकारकडून होत असलेला हलगर्जीपणा आणि आगामी विधानसभा निवडणुका यावर चर्चा झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर यामुळे सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सक्रिय होणार कि फक्त या चर्चाच ठरणार हे महत्वाचे आहे.

दरम्यान, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे म्हटले होते. ‘लोकांना परिवर्तन हवं आहे. त्यामुळे नव्या चेहेऱ्यांना, नव्या रक्ताला संधी दिली पाहिजे, येत्या विधानसभा निवडणुकीत हा बदल करावा लागेल,’ असे त्यांनी एका प्रचारसभेत म्हटले होते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत अनेक जेष्ठ नेत्यांना आराम देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद

दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम