‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या तान्हाजी सिनेमातील काही सीनमध्ये बदल केलेला एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या वादग्रस्त व्हिडीओनंतर राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. यावर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळेंनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.

ट्विट करत भाजपचा समाचार घेताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पुस्तक प्रकाशनानंतर दिल्ली भाजपने ही दुसरी अक्षम्य कागाळी केली आहे. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारी जनता हे अजिबात खपवून घेणार नाही. भाजपला या कृतीबद्दल महाराष्ट्राची आणि शिवप्रेमी जनतेची माफी मागावी लागेल.” असंही त्या म्हणाल्या आहेत. इतकेच नाही तर असा व्हिडीओ करणं म्हणजे स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या तान्हाजी मालुसरे यांचा हा अपमान आहे” असंही त्या म्हणाल्या.

तान्हाजी सिनेमातील दृश्यांमध्ये मॉर्फींग केलेला एक व्हिडीओ पॉलिटीकल किडा या ट्विटर हँडलरवरून चालवण्यात आला आहे. या व्हिडीओत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तर तान्हाजी मालुसरेंच्या चेहऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. या वादग्रस्त व्हिडीओमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा –