मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर मग काय NOC सातार्‍यातून मागवायची ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच महाराष्ट्रातील ‘जाणता राजा’ असल्याचं प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांना दिलं. शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणार पुस्तक ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी…’ प्रकाशित झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना उत आला.

यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, म्हणाले की, हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा शरद पवार यांचा अभ्यास आहे. राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न आदी प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांच्याकडे असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. शरद पवार यांची करंगळी पकडून अनेकजण राजकारणात आले.

अनेकांनी त्यांच्यावर टीका करून राजकारणात प्रस्थापित झाले असल्याचा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. तसेच कुणाच्या घरात मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर काय एनओसी साताऱ्यातून मागवायची का? शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवलं जातं असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like