काँग्रेस-राष्ट्रवादीमधील कळीच्या मुद्द्यांवर पवारांच्या घरी मध्यरात्रीपर्यंत बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीच्या तयारीत मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमधील जे कळीचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी काल शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. हि बैठक सलग चार तास चालली आणि मध्यरात्री पर्यंत चालली.

शरद पवार यांच्या घरी झालेल्या या बैठकीत अजित पवार, दिलीप वळसे पाटील, गणेश नाईक, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाच्या वाटाघाटी या बैठकीत झाल्या आहेत. त्याच प्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जे कळीचे मुद्दे आहेत त्यावर चर्चा झाली आहे.

औरंगाबाद आणि अहमदनगरच्या जागेवरून दोन्ही पक्षामध्ये तिढा कायम आहे म्हणून या दोन्ही जागांवर काय तोडगा काढायचा याबद्दल देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील पुत्र सुजय विखे पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. या भेटून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत देखील दिले आहेत. त्या मुद्दयांवर देखील या बैठीकीत चर्चा झाली आहे.

ह्याहि बातम्या वाचा

ट्रीटमेंट नंतर इरफान भारतात परतला, पहा त्याची पहिली झलक

‘पोलीसनामा’ ऑनलाईन महाराष्ट्रात १ नंबर

अप्पर पोलीस महासंचालक परम बीर सिंग यांची महासंचालकपदी नियुक्‍ती

सासूच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेची आत्‍महत्‍या