रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडली ; पुण्याबाबत संभ्रम कायम

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील जवळपास सर्व जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिलेले आहेत. केवळ रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवाराची घोषणा अद्याप राष्ट्रवादीने केलेली नव्हती. दरम्यान, रावेर आणि पुणे लोकसभेच्या जागेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक्सचेंज करतील अशी बातमी सर्वप्रथम पोलीसनामा ऑनलाइनने दोन दिवसांपुर्वी दिली होती. पुन्हा एकदा पोलीसनामा ऑनलाइनच्या विश्‍वासहर्ततेवर शिक्‍कामोर्तब झाले असुन राष्ट्रवादी काँग्रेसने रावेर लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेसला सोडली आहे.

पुणे आणि रावेर लोकसभा मतदार संघात दोन्ही पक्षाकडून उमेदवारी जाहिर करण्यात आलेली नव्हती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने रावेरची जागा काँग्रेसला सोडली असल्याने आता पुणे लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रावेरची जागा काँग्रेसला सोडली असली तरी अद्याप काँग्रेसने रावेर येथील उमेदवार सोडलेला नाही. पुण्याची जागा काँग्रेस राष्ट्रवादीला देणार काय अशी चर्चा चालु झाली आहे. दरम्यान, त्याबाबत अद्याप काही एक निर्णय झालेला नाही असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पोलीसनामा ऑनलाइनने दिलेले वृत्‍त खरे ठरले आहे. पोलीसनामा ऑनलाइनच्या विश्‍वासहर्ततेवर पुन्हा एकदा शिक्‍कामोर्तब झाले आहे.