राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारानं बोलावली कार्यकर्त्यांची बैठक : भाजपमध्ये प्रवेश करणार ?

सोलापूर :पोलीसनमा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणावर आमदार आणि नेते सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. जवळपास दोन डझन नेत्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिली असून अजूनही आमदार भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत.

त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी या आमदारांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून यामध्ये ते आपला निर्णय घेणार असल्याचे समजते. माढ्यातील आमदार बबनदादा शिंदे यांनी हि बैठक बोलावली असून त्यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर हि बैठक पार पडणार आहे. त्यावेळी आमदार शिंदे आपल्या कार्यकर्त्यांना याविषयी विचारणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून शिंदे हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजत होते, मात्र त्यांनी याविषयी निर्णय घेण्यासाठी आता कार्यकर्त्यांची बैठक बोलावल्याने त्यांनी निर्णय नक्की केल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीचा प्लॅन तयार
अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगात होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाला उधाण आले होते. मात्र काही देवाणघेवाण बाकी असल्याने त्यांचा प्रवेश लांबल्याने बोलले जात आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात कंबर कसली असून त्यांचे विरोधक शिवाजी कांबळे यांना मैदानात उतरवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –