NCP Mahesh Tapase | “बावनकुळे यांनी आपल्या मेंदूची आधी तपासणी करुन घ्यावी…”; राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांचा टोला

पोलिसनामा ऑनलाईन: भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांच्या साताऱ्यातील (Satara) पत्रकार परिषदेत आपत्तीजनक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, ‘अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackarey) शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी जादूटोणा केला. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) बरोबर गेले.’ या वक्तव्यामुळे राजकीय वादळ उठले आहे. आधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ट्विट करून या वक्तव्याची टीका केली, आता राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ही याला उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते (Chief Spokeperson) महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, “भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूची आधी तपासणी करुन घ्यावी आणि मग बोलावे”. तसेच, “जादूटोणा, भोंदूबाबा हे शब्द सभ्य संस्कृतीतील नाहीत. राजकारण करायचं असेल तर मुद्दयावर राजकारण करा.” असा सल्ला महेश तपासे यांनी बावनकुळे यांना दिला.

याशिवाय “महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा कोणत्या सरकारने आणला याचा विसर बावनकुळे यांना पडला असावा.”, असा टोला लगावतानाच “शरद पवार यांची पकड महाराष्ट्रावर आहे.
तुमच्यासारख्या जातीयवादी पक्षाच्या तावडीतून शिवसेनेला मुक्त करुन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांना केले ही किमया पवारांची आहे. त्यामुळे २९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल येईल,
तेव्हा तुमचे सरकार पायउतार होणार हे निश्चित आहे. त्यानंतर तुम्हाला जादूटोणा जे काही करायचं ते करा.
” असेही महेश तपासे यांनी बावनकुळे यांना सुनावले आहे.

Web Title :-  NCP Mahesh Tapase | chandrasekhar bawankule should check his brain first ncps response to criticism of sharad pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update