राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मंत्रिपद ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे खातेवाटप निश्चित झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक खाते मिळणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. ज्या जिल्ह्यात ज्याचे आमदार जास्त त्या जिल्ह्यात त्या पक्षाचा पालकमंत्री असेल. तसेच पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यात पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्रिमंडळाविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘तीन आमदारांच्या मागे एक मंत्री अशी मंत्रिमंडळाची रचना आहे. पुणे जिल्ह्यात दहा आमदार असल्यानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आणखी एका मंत्रिपदाची मागणी केली आहे. ते मिळेल, अशी मला अपेक्षा आहे.’

विधीमंडळाच्या अधिवेशनानंतरच खातेवाटप आणि मंत्रिमंडळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह सर्वाधिक 16 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीत अजूनही ट्विस्ट कायम आहे. शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह 15 मंत्रिपदे येतील. तर काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील अशी माहिती मिळाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like